loader
Breaking News
Breaking News
Foto

ममता बॅनर्जी बंडखोर टीएनसी खासदारांवर कारवाई करु शकतात?

नवी दिल्ली - तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी २० बंडखोर खासदारांचे सदस्य पद रद्द करण्यासाठी कधीही मोठी कारवाई करु शकतात. ज्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व ते गमावू शकतील. सायनी घोष आणि काकोली घोष यांच्यासह खासदारांचे मोठे नुकसान होणार आहे. अद्याप १९ खासदारांच्य सह्या पाहता त्यामुळे ही स्थिती निर्माण होवू शकते. खासदार काकोली घोष यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाचा दावा आहे की, त्यांना २० खासदारांचा पाठिंबा आहे, ज्यांना टीएमसीमधून बाहेर पडून एक नवीन गट स्थापन करायचा आहे. तथापि, आता शत्रुघ्न सिन्हा आणि सायनी घोष यांच्याबाबत एक मोठा पेच निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हिदुत्वावरील त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेक भाजप नेत्यांनी सायनी घोष यांच्या एनडीएतील प्रवेशाला विरोध केला आहे. तर शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, ते ममता दीदींना कधीही सोडणार नाहीत. लोकसभेत टीएमसीचे एकूण २८ खासदार आहेत. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्रता टाळण्यासाठी किमान दोन-तृतीयांश म्हणजेच १९ खासदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. बंडखोर गटाचे म्हणणे आहे की, २० खासदार असल्याने ते या कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत, परंतु जेव्हा सह्यांची वेळ आली, तेव्हा बंडखोर खासदारांपैकी केवळ १९ जणांनीच सह्या केल्या.

टाईम्स स्पेशल

जर या १९ खासदारांमधून सायनी घोष आणि शत्रुघ्न सिन्हा यांना वगळले, तर बंडखोर आमदारांची संख्या १७ राहते. या संपूर्ण परिस्थितीत, ओम बिर्ला यांना इच्छा नसतानाही या सर्व खासदारांना अपात्र ठरवावे लागेल आणि त्यांना पुन्हा पोटनिवडणूक जिंकावी लागेल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg