loader
Breaking News
Breaking News
Foto

मोटार ट्रेनिंग स्कूल असोसिएशन, रत्नागिरीकडून फोर व्हीलर प्रशिक्षणाचे नवीन दर जाहीर

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : रत्नागिरी जिल्ह्यातील मोटार ट्रेनिंग स्कूल व्यवसायासमोरील वाढत्या आर्थिक आव्हानांचा विचार करून मोटार ट्रेनिंग स्कूल असोसिएशन, रत्नागिरी यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फोर व्हीलर (LMV) प्रशिक्षणासाठी नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. सध्या इंधन दरामध्ये सातत्याने होत असलेली वाढ, वाहनांच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च, विमा हप्ता, टायर खर्च, प्रशिक्षकांचे वेतन तसेच इतर प्रशासकीय खर्च यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे प्रशिक्षण शुल्कामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सभेत एकमताने ठरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानुसार फोर व्हीलर (LMV) प्रशिक्षणासाठी 24 दिवसांचे प्रशिक्षण व जास्तीत जास्त 150 किलोमीटर ड्रायव्हिंग प्रशिक्षणाकरिता ₹9,000/- शुल्क निश्चित करण्यात आले आहे. सदर नवीन दर 1 जुलै 2026 पासून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मोटार ट्रेनिंग स्कूलमध्ये लागू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मोटार ट्रेनिंग स्कूल संचालकांनी संघटनेच्या निर्णयानुसार एकसमान दररचना अमलात आणून सहकार्य करावे, असे आवाहन असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. एकसमान दरपद्धतीमुळे प्रशिक्षण व्यवसायामध्ये सुसूत्रता राखण्यास, अनावश्यक स्पर्धा टाळण्यास तसेच प्रशिक्षणाची गुणवत्ता अधिक प्रभावीपणे टिकवून ठेवण्यास मदत होणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg