संगलट (खेड) (प्रतिनिधी) - दापोली शहरातील एसटी स्टँडच्या मागील परिसरातील रहिवासी व सर्व पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका अतिशय गंभीर आणि सुरक्षेशी संबंधित समस्येकडे प्रशासनाने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. दापोली शहरातील काही मुख्य परिसरातील व मुख्य रहदारीच्या वाटेवर गेल्या काही दिवसांपासून ’रग्या’ आणि ’टग्या’ या नावांनी ओळखल्या जाणार्या दोन बैलांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. हे दोन्ही बैल अत्यंत उन्हाड व आक्रमक झाले असून, ते सतत रस्त्याच्या मध्यभागी ठाण मांडून बसतात किंवा आपापसात लढत सुटतात.
या मुख्य रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक आणि शाळकरी मुले ये-जा करत असतात. सध्या शाळा सुरू झाल्या असून, सकाळी व संध्याकाळी लहान मुलांना याच वाटेने शाळेत जावे लागते. मात्र, या बैलांच्या हिंसक व आक्रमक वर्तनामुळे शाळकरी मुलांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलांना एकटे शाळेत पाठवणे पालकांसाठी अत्यंत धोक्याचे वाटू लागले आहे. अनेकदा हे बैल रस्त्यावरून जाणार्या पादचार्यांच्या व वाहनांच्या अंगावर धावून जातात, ज्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आम्ही स्थानिक प्रशासनाला नम्र विनंती करतो की, कोणत्याही दुर्दैवी घटनेची किंवा अपघाताची वाट न पाहता, या दोन्ही उन्हाड बैलांचा व इतर मोकाट गुरांचा त्वरित बंदोबस्त करावा. त्यांना ताब्यात घेऊन योग्य ठिकाणी (उदा. गोशाळा किंवा कोंडवाडा) हलवण्यात यावे, जेणेकरून आमचा परिसर भयमुक्त होईल आणि शाळकरी मुले सुरक्षितपणे शाळेत जाऊ शकतील. आपण या समस्येचे गांभीर्य ओळखून त्वरित कारवाई कराल, अशी आम्हा सर्व पालकांची आणि नागरिकांची आग्रहाची मागणी आहे.














































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.