वेळणेश्वर : तालुक्यातील पडवे-तवसाळ येथे नदीत पोहण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संजोग शशिकांत सुर्वे (वय ३५, रा. पडवे भंडारवाडा, ता. गुहागर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी संजोग सुर्वे हा त्याचे मित्र निखिल सुर्वे, विनायक गडदे आणि अक्षय सुर्वे यांच्यासह बाहेर गेला होता. त्यानंतर हे सर्वजण पडवे-तवसाळ येथील महामाई सोनसाखळी गावदेवी मंदिराजवळील नदीत पोहण्यासाठी उतरले. पोहत असताना संजोग सुर्वे याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला आणि पाण्यात बुडाला.
मित्रांनी तत्काळ त्याला बाहेर काढले. त्या वेळी त्याच्या नाका-तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले. त्याचा जीव वाचविण्यासाठी मित्रांनी प्रयत्न केले. अक्षय सुर्वे याने कृत्रिम श्वसन देण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर संजोग सुर्वे याला तातडीने रुग्णवाहिकेतून हेदवी येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, आबलोली येथे हलविण्यात आले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणाची नोंद गुहागर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पडवे भंडारवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.













































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)
































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.