संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाचे केंद्र असलेल्या संगमेश्वर एस.टी. बस स्थानकावर पावसाच्या आगमनानंतर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. बस स्थानक परिसरात साचलेल्या चिखलामुळे आणि पाण्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, ठेकेदाराच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सोनवी पुलाच्या कामासाठी तयार केलेल्या सेवा रस्त्यावरून पावसाचे पाणी थेट बस स्थानकाच्या आवारात शिरत असल्याने गेल्या दोन वर्षांपासून स्थानकाची दुर्दशा झाली आहे. रस्ता बनवताना पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणतीही गटार व्यवस्था न केल्याने, डोंगरावरून येणारे पाणी थेट बस स्थानकात साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
येथून प्रवास करणाऱ्या शालेय मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. निसरड्या चिखलामुळे प्रवाशांचे पाय घसरून पडण्याचे प्रकार घडत असून, मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, बस स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या अंगावर वाहनांमुळे चिखलमिश्रित पाणी उडत असल्याने दररोज प्रवाशांची आणि वाहनचालकांची वादावादी होत असते. कोट्यवधी रुपये खर्च करूनही जनतेच्या पदरी केवळ मनस्ताप पडत असल्याने महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पावसाच्या या दिवसांत शालेय विद्यार्थ्यांचे दप्तर आणि गणवेश चिखलाने माखत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ पाणी निचरा करण्यासाठी आणि बस स्थानक परिसर स्वच्छ करण्यासाठी उपाययोजना करावी, अन्यथा कोणत्याही मोठ्या दुर्घटनेला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा संतप्त प्रवाशांनी दिला आहे.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.