loader
Breaking News
Breaking News
Foto

आजगाव ग्रामस्थांच्या पाठीशी पालकमंत्री : संजू परब

सावंतवाडी : आजगाव येथे रात्री पोलिस प्रशासन आणि ग्रामस्थांत सुसंवाद घडला असून संबंधित कंपनीच्या माणसांना ग्रामस्थांनी पोलिसांच्या स्वाधीन केले.‌ यात संबंधितांकडून कोणतीही मारहाण न झाल्याचे तसेच त्रास न‌ दिल्याचा जबाब दिला. मात्र, आज सावंतवाडी पोलिस ठाण्यात अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेत. मात्र, शिवसेना पक्ष तसेच पालकमंत्री नितेश राणे ग्रामस्थांच्या पाठीशी उभे आहेत असा शब्द शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परब म्हणाले, ग्रामस्थांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा शिवसेना निषेध करत आहे. आम्ही ग्रामस्थांच्या पाठीशी असून पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी देखील माझं बोलणं झालं आहे. ते देखील ग्रामस्थांच्या बाजूने उभे राहणार असल्याचा शब्द त्यांनी दिला आहे अशी माहिती परब यांनी देत अजामीनपात्र गुन्हे दाखल करणाऱ्यांचा निषेध नोंदवला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेव्हिअर फर्नांडिस, युवासेना तालुकाप्रमुख क्लॅट्स फर्नांडिस, ॲड. स्वप्नील प्रभू आजगावकर, मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे, राजेश आजगावकर, प्रशांत काकतकर, अमित प्रभू, सचिन प्रभू, आबा चीपकर, नील प्रभूझांट्ये, संघर्ष समितीचे अध्यक्ष नातू यांच्यासह आजगाव दशक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg