loader
Breaking News
Breaking News
Foto

तेरेवायंगणी हायस्कूलमध्ये नवोगतांचे स्वागत उत्साहात

दापोली (प्रतिनिधी) : शिवनेरी शिक्षण संस्था तेरेवायंगणी संचलित कै. कमलाकर जनार्दन तथा भाई जावकर विद्यामंदिर तेरेवायंगणी येथे प्रवेशोत्सव व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शिवनेरी शिक्षण संस्थाध्यक्ष निवास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला आयएपीए समन्वयिका वैद्य, संस्था पदाधिकारी भिकाजी करबेले, डी. एल. कोलंबे, किसन भातडे, तानाजी शिगवण, शंकर शिगवण, मनोहर करबेले, नारायण कावणकर, हरिश्चंद्र भातडे, पांडुरंग शिगवण, लक्ष्मण मोहिते, चंद्रकला शिगवण, शर्मिला शिगवण, गीता भुवड, अन्वी शिगवण तसेच मुख्याध्यापक शिगवण, पांदे, सदावर्ते, तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थित पालक व नवोदित विद्यार्थी यांचे स्वागत करण्यात आले. यावर्षी इयत्ता आठवीला 17 तर नववीला 3 विद्यार्थी दाखल झाले. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वितरण करण्यात आले. माजी विद्यार्थी नरेश सुरेश शिगवण यांच्यावतीने इयत्ता दहावीच्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ₹1000/- व IAPA कडून स्कुल बॅग देऊन गौरविण्यात आले. तसेच उर्वरित उत्तीर्ण विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदावर्ते यांनी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg