वेळणेश्वर (उमेश शिंदे) : महाराष्ट्र शासनाच्या ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील काताळे ग्रामपंचायतच्या वतीने समता फाउंडेशन आणि भक्तश्रेष्ठ कमलाकर पंत वालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण २८ लाभार्थ्यांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या ओळखून त्यावर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हे अभियान राबविले आहे. तवसाळ खुर्द, तवसाळ आणि काताळे या महसूल गावांचा समावेश असलेल्या काताळे ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कोळवली व उपकेंद्र तवसाळ खुर्द यांच्या संपूर्ण आरोग्य पथकाने विशेष सहकार्य केले.
शिबिराचे उद्घाटन गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांच्या हस्ते झाले. यावेळी काताळे ग्रामपंचायत प्रशासक प्रियांका सुर्वे, पडवे ग्रामपंचायत प्रशासक मुजीब जाभारकर, ग्रामपंचायत सदस्य जद भाटकर, नेत्रचिकित्सक नितीश शेट्ये, ओंकार कटक, श्रीधर रसाळ, तवसाळ ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप सुर्वे, काताळे बौद्धवाडीचे ज्येष्ठ ग्रामस्थ यशवंत पवार, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष शंकर यद्रे, संदीप रसाळ तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी योगेश गवारे, विशाल राठोड, शरद गडदे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, उपकेंद्र कर्मचारी, ग्रामस्थ आणि विविध शासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिरामध्ये एकूण २८ लाभार्थ्यांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. तपासणीनंतर ज्यांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, अशा रुग्णांच्या शस्त्रक्रिया लवकरच डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती नेत्रचिकित्सक डॉ. नितीश शेट्ये यांनी दिली. ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून काताळे ग्रामपंचायत प्रशासक प्रियांका सुर्वे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


















































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.