loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. प्राथमिक शाळा दयाळ पूर्व गौळ येथे शाळा प्रवेशोत्सव व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

खेड - खेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दयाळ पूर्व गौळ येथे शाळेच्या पहिल्या दिवशी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव संपन्न झाला. विद्यार्थ्यांची शालेय परिसरातून मिरवणूक काढून त्यांच शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर अशा मंगलमय प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी मनोज जाबरे यांच्या सहकार्याने कार्तिकी इंटरप्राईजेस टिटवाला चे सर्वेसर्वा संदीप बाणे या दोघांतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक विविध प्रकारच्या वह्या व छत्र्या वाटप करण्यात आल्या. त्याचबरोबर किशोर उर्फ कृष्णा करंजकर यांच्या संकल्पनेने पागारवाडी मित्र मंडळ मुंबईतर्फे विद्यार्थ्यांना दप्तर व इतर शालोपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, त्याचबरोबर शासनातर्फे मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी दयाळ गावचे माजी सरपंच महेंद्र बुरटे, दयाळ शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र बुरटे, आंबणकरीण सेवा मंडळ अध्यक्ष राजेंद्र गायकर, स्कूल कमिटी माजी अध्यक्ष अनंत जंगम, दयाळ ग्राम कमिटी माजी अध्यक्ष अशोक जोशी, ग्रामपंचायत माजी सदस्य सखाराम महाडिक, दयाळ सोसायटी माजी चेअरमन सुरेश जोशी तसेच माजी सैनिक लक्ष्मण धाडवे, शिक्षण प्रेमी व्यवस्थापन समिती सदस्य राजाराम काते, दिनेश खेडेकर, काशीराम पागार, आत्माराम भडवळकर, संतोष बिरवटकर, नरेश खेडेकर, अनंत पागार, संदेश पागार, सुमित पागार, मनीष पागार, उमेश जंगम, सुभाष बिरवटकर, सोहम बिरवटकर, सचिन पगार, अंगणवाडी सेविका पूजा कदम, मदतनीस अरुणा भडवळकर, स्वयंपाकी दीपिका कोळंबे आदी मान्यवर उपस्थितीत होते. उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक दीपक तांबे यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचलन शिक्षक प्रशांत दळवी यांनी केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg