loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपा महाविद्यालयामध्ये श्रीराम कृपा सामाजिक संस्थेमार्फत शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालूक्यातील साखरपा येथे श्रीराम कृपा संस्थेच्या वतीने प्रा. आबा सावंत कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभ राष्ट्रगीताने झाला. यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच विविध क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. श्रीराम कृपाचे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर प्रीतेश देसाई आणि राजेंद्र कदम आणि मानस देसाई यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिक्षण प्रसारक मंडळ किरबेट संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबाजी सावंत यांनी श्रीराम कृपा सामाजिक संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. कोंडगाव चे पहिले लोकनियुक्त माजी सरपंच तसेच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बापू शेट्ये यांनी आपल्या मनोगतामध्ये या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करून संस्थेचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रसाद झेपले यांनी केले. तर उपस्थितांचे आभार महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.शिल्पा वैद्य यांनी मांनले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच श्रीराम कृपा सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg