loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली-भेडशी बाजारपेठेत कोंबडया वाहतूक करणार्‍या मद्यधुंद वाहन चालकाने चारचाकी वाहनांसह ४ दुचाकी उडवल्या

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गजबजलेल्या साटेली भेडशी बाजारपेठमध्ये बुधवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास बॉयलर कोंबडया वाहतूक करणार्‍या मद्यधुंद चालकाने दारुच्या नशेत साटेली भेडशी बाजारपेठ मध्ये युको कार सह चार वाहनाना धडक दिली. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाही. पण पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला चालक समोर वाहन आल्याने चांगलाच तावडीत सापडला. संतप्त नागरिकांनी चांगला चोप देऊन कोंबडया वाहतूक गाडी आरोग्य केंद्र आवारात अडवून ठेवली. जोपर्यंत झालेले नुकसान मिळत नाही तोपर्यंत गाडी सोडणार नाही असा पवित्रा लोकांनी घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घाटमाथ्यावरील २० ते २५ वाहने सर्व नियम धाब्यावर बसवून दोडामार्ग तसेच गोवा राज्यात कोंबडया वाहतूक करतात. दिवसरात्र वाहने चालतात हे चालक गोवा येथून मद्यपान करून येतात. बुधवारी रात्री ७.३० वाजता गोवा येथे कोंबडया खाली करून काही कोंबडया घेऊन पुन्हा साटेली भेडशी बाजारपेठ येथून घाटमाथ्यावर जायला निघालेल्या कोंबडया वाहतूक चालकाने साटेली भेडशी बाजारपेठेमध्ये वाहनांना धडक देत देत हंगामा केला. रस्ताकडेला उभी युको कार तसेच चार दुचाकी वाहनांना धडक देऊन नुकसान केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी तसाच पुढे पळण्याचा प्रयत्न करताना समोर वाहन आल्याने चालकाला संतापलेल्या युवकांनी पकडले. यावेळी कोंबडया वाहतूक वाहनात दोघे जण होते. संतप्त नागरिकांनी चालकाची नशा उतरून ठेवली. अखेर काही जणांनी नुकसान भरपाई द्यावी यासाठी चर्चा सुरू होती. या धडकेत वाहनांचे नुकसान झाले, दोन तीन जणांनी गाडी बाहेर मारल्याने जीव वाचला. या मद्यधुंद चालकाने बेकरी जवळ चार दुचाकी उडवल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg