खेड (प्रतिनिधी) -मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल केली आहे. पहिल्याच सरीत महामार्गाचा काही भाग खचल्याने खेड तालुक्यातील आवाशी येथे एक भीषण अपघात घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खेडकडून चिपळूणच्या दिशेने जाणारा एक मालवाहतूक ट्रक रस्ता खचल्याने थेट उलटला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील आवाशी परिसरात सध्या रस्त्याचं काम अद्यापही सुरूच आहे. पावसाळा सुरू झाला तरी हे काम पूर्ण न झाल्याने आधीच वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यातच आज पावसाची पहिली मोठी सर कोसळताच नवनिर्मित रस्त्याचा भाग खचला. खेडहून चिपळूणकडे माल वाहून नेणारा ट्रक आज या मार्गावरून जात असताना, आवाशी येथे अचानक चाकांखालील रस्ता खचला. वजन पेलू न शकल्याने ट्रक एका बाजूला पलटी झाला. सुदैवाने चालकाचे नियंत्रण राहिल्याने आणि आजूबाजूला इतर वाहने नसल्याने मोठा अनर्थ टळला.
पावसाळ्यापूर्वी महामार्गाची कामे सुरक्षित करण्याची मोठी मोठी आश्वासने प्रशासनाकडून दिली जात होती. मात्र, पहिल्याच दिवशी महामार्ग खचल्याने या कामाच्या दर्जावर आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर आता स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.












































































































































































.jpg)















































































.jpg)

















































































































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)





























































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.