loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीराम वाचन मंदिराच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) - येथील श्रीराम वाचन मंदिराच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवा निमित्त वर्षभर विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. याच्या पूर्वतयारीसाठी २८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीराम वाचन मंदिर सभागृहात पदाधिकारी, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेऊन प्राथमिक नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. संस्थेच्या कार्यकारिणीची सभा मंगळवारी श्रीराम वाचन मंदिरात आयोजित करण्यात आली होती. संस्था आपल्या १७५ व्या वर्षात पदार्पण करत असून, ही सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या महोत्सवी वर्षानिमित्त मान्यवरांची व्याख्याने, युवा व महिला वर्गासाठी विशेष कार्यक्रम आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन यांसारखे विविध उपक्रम राबविण्याचे या सभेत निश्चित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नवनिर्वाचित सरपंचांचा व प्राचार्यांचा सत्कारयाच बैठकीत संस्थेच्या वतीने दोन महत्त्वाचे सत्कार करण्यात आले. श्रीराम वाचन मंदिराच्या सहाय्यक ग्रंथपाल रंजना कानसे यांची माजगाव (ता. सावंतवाडी) सरपंचपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे सहकार्याध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत थेट जनतेतून रंजना कानसे विजयी झाल्या आहेत. ही संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे सांगत संस्थेचे कार्यवाह रमेश बोंद्रे यांनी त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

संस्थेच्या संचालिका डॉ. सुमेधा नाईक-धुरी यांची सावंतवाडी येथील 'आरपीडी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज'च्या प्रभारी प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. प्रसंगी संस्थेचे कार्यवाह रमेश बोंद्रे, कार्याध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर, सहकार्यवाह बाळ बोर्डेकर, संचालक प्रा. प्रवीण बांदेकर, राजेश मोंडकर, ग्रंथपाल महेंद्र पटेल, महेंद्र सावंत आणि प्रसाद वाडकर प्रामुख्याने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg