loader
Breaking News
Breaking News
Foto

कसई-दोडामार्गच्या विकासाला नवी झेप; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण

दोडामार्ग (प्रतिनिधी) - कसई-दोडामार्ग नगरपंचायत क्षेत्रातील विकासाला नवी गती देणाऱ्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन सोमवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. सिंधुरत्न योजनेअंतर्गत तळे सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले, तर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘नमो गार्डन’ प्रकल्पाचा शुभारंभ भूमिपूजनाने करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना पालकमंत्री राणे यांनी पर्यटन, नागरी सुविधा आणि सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून कसई-दोडामार्गचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे सांगितले. सिंधुरत्न योजनेतून विकासकामांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नसून, शहराला अधिक आधुनिक, सुविधायुक्त आणि पर्यटनाभिमुख बनविण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दोडामार्ग परिसरातील पर्यटन क्षमतेचा विचार करून दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

टाईम्स स्पेशल

कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी नगरपंचायतीच्या विकासाभिमुख कामकाजाचे कौतुक करत नागरिकांच्या हिताच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष वैभव गवस, नगरसेवक संतोष नाईक, नितीन माणगांवकर, सभापती पार्वती गवस, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, शिक्षण व आरोग्य सभापती संजना डिचोलकर यांच्यासह नगरपंचायतीचे पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg