loader
Breaking News
Breaking News
Foto

साटवली रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यात पावसाला सुरवात होताच भलेमोठे आकेशियाचे झाड साटवली रस्त्याच्या मध्यभागी पडल्याने साटवली येथील पालयेवाडी येथील वहातूक ठप्प झाली. सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सदर घटना घडली असून काही काळ वाहतूक ठप्प झाल होती. अजून पावसाळा पूर्णपणे सुरू व्हायचा असुन सुरूवातीच्या पावसानेच झाडे पडू लागली आहेत. या घटनेमुळे वहातूक ठप्प झाल्याने सकाळी शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. नोकरदार वर्गाला देखील आपल्या नियोजित स्थळी जाण्यासाठी विलंब झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg