loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी अकॅडमी, महाड व गुरुकुल अकॅडमी हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट, महाडचे MHT-CET (PCB) परीक्षेत दैदिप्यमान यश

खेड (प्रतिनिधी) - एमएचटी - सीईटी (MHTCET) पी.सी.बी. ग्रुप परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी प्रतिष्ठान खेड संचलित रोटरी अकॅडमी, महाड व गुरुकुल अकॅडमी हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट, महाडच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. इयत्ता 12 वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी व ॲग्रीकल्चर यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सदर एमएचटी - सीईटी (MHT CET) परीक्षा ऑनलाईन रित्या घेतली जाते. यावर्षीही ( MHT CET) या परीक्षेत रोटरी प्रतिष्ठान खेड संचलित रोटरी अकॅडमी, महाड व गुरुकुल अकॅडमी हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट, महाडच्या PCB ग्रुपच्या विद्यार्थ्यांमधील एकूण 7 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेनटाईल तर 13 विद्यार्थ्यांनी 80 पेक्षा अधिक पर्सेनटाईल गुण मिळिवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

(MHT CET) PCB या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये संजना साळवी - 98.62 पर्सेनटाईल, रुची भोसले - 98.05 पर्सेनटाईल, श्रावणी गवळी 97.13 पर्सेनटाईल, तनिष्का पुरबूज - 96.66 पर्सेनटाईल व नंदिनी राठोड - 95.82 पर्सेनटाईल यांनी 95 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण मिळवून यश प्राप्त केले. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी या विषयांचे शिक्षक, वर्गशिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ( MHT CET ) PCB या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg