loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्गात वीज सुरक्षेचा बोजवारा; अपघाताची वाट पाहतेय महावितरण!

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग-बांदा महामार्गालगतच्या वीज खांबांवर आणि वीज वाहिन्यांवर वेलींचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या वेली थेट तारांवर पसरल्याने कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होण्याची, शॉर्टसर्किट होण्याची किंवा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, महामार्गालगतच ही परिस्थिती असताना महावितरणच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हे दिसत नसेल, तर दुर्गम ग्रामीण भागातील अंतर्गत वीज वाहिन्यांची अवस्था किती बिकट असेल, याचा विचारही न केलेलाच बरा, असा संतप्त सवाल दोडामार्ग राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस यांनी उपस्थित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाळा सुरू असताना झाडांच्या फांद्या, वेली आणि झुडपांमुळे वारंवार वीज खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. त्याचा फटका शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. नागरिकांना अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन देणाऱ्या महावितरणने केवळ बिल वसुलीवर भर न देता वीज वाहिन्यांच्या देखभालीकडेही गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. "वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्ती करण्यापेक्षा संभाव्य धोके आधीच दूर करणे ही महावितरणची जबाबदारी आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा आताच सर्व वीज वाहिन्यांवरील वाढलेली झाडी, झुडपे आणि वेली हटविण्यासाठी विशेष मोहीम राबवावी," अशी ठाम मागणी बाबू गवस यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg