loader
Breaking News
Breaking News
Foto

रोटरी क्लबतर्फे के. व्ही. कन्या हायस्कूलला सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन भेट

पनवेल : येथील के. व्ही. कन्या हायस्कूलमध्ये रोटरी क्लबच्या वतीने सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन प्रदान करून सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या कार्यक्रमाला क्लबचे अध्यक्ष निलेश पोटे, हितेश राजपूत, व्ही. सी. म्हात्रे, चारूदत्त भगत, ऋग्वेद कांडपीळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थिनींच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान शाळेच्या मुख्याध्यापिकांनी व्ही. सी. म्हात्रे, अध्यक्ष निलेश पोटे तसेच रोटरी क्लबचे आभार व्यक्त करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. उपस्थितांनीही या उपक्रमाचे स्वागत करत अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg