loader
Breaking News
Breaking News
Foto

शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना ! ; अमित शाहांच्या विधानाने राजकीय क्षेत्रात खळबळ

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूरमधील सभेत बोलताना शिवसेनेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. सभेत भाषण करताना अमित शाह म्हणाले की, यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा उल्लेख करताना “शिंदे गट” असा उल्लेख केला जात होता. मात्र आता परिस्थिती बदलली असून शिवसेना एकच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमित शाह यांनी पुढे सांगितले की, आता कोणताही स्वतंत्र गट उरलेला नाही. निवडणूक आयोग आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर शिवसेना ही एकच असून ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असल्याचे त्यांनी म्हटले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, शिवसेनेतील फूट आणि पक्षाच्या ओळखीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या या विधानाकडे महत्त्वाच्या राजकीय संदेशाच्या रूपात पाहिले जात आहे. दरम्यान, शाह यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, आगामी काळात यावरून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg