loader
Breaking News
Breaking News
Foto

शक्तीपीठ महामार्गाचा आराखडा अंतिम; सिंधुदुर्ग जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेला वेग

सावंतवाडी (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) मार्फत हाती घेण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'पवनार ते पत्रादेवी (नागपूर-गोवा) महाराष्ट्र शक्तीपीठ एक्सप्रेसवे (विशेष) क्र. १०' च्या उभारणीसाठी भूसंपादन प्रक्रियेने वेग घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (मंत्रालय, मुंबई) महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ च्या कलम ४ अन्वये अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली असून, त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमधील जमीन संपादनाचा सविस्तर आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण थेट जोडले जाणार असून धार्मिक पर्यटनाला व आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार आहे. शासनाने या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी जमीन संपादित करण्याचा मानस घोषित केला असून, हरकती व सूचना नोंदवण्यासाठी २१ दिवसांची मुदत दिली आहे. संबंधित भूधारकांनी आपल्या हरकती उपविभागीय अधिकारी (सावंतवाडी उपविभाग) तथा भूसंपादन अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात सादर करावयाच्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​बाधित होणारी प्रमुख गावे आणि क्षेत्रफळाचा तपशील: ​तालुका: दोडामार्ग तालुक्यातील खालील गावांचा समावेश मुख्यत्वे करण्यात आला आहे: ​कुंभवाडे : गट क्र. १५ (११.७१.२६ हेक्टर), १३, ७, ६, १४ यांसह एकूण महत्त्वाचे गट समाविष्ट आहेत. ​फुकेरी : गट क्र. २८, २७, ३४, ३३, ३५, ४०, ३२, ३६ (९.७४.५८ हेक्टर), ३७ यांसह विविध लहान-मोठे भूखंड समाविष्ट आहेत. ​झोलंबे : गट क्र. २३, ८१, २४ (७.३६.५७ हेक्टर), ८६, ११७/A, ७२ (५.०८.४६ हेक्टर), ९०, ८९, ९१, ९४, ११९, २२. ​बांदा - सीमावर्ती भाग: गट क्र. १९६, १९७, १९३ (१.९५.२१ हेक्टर), १९४, १९५, १९८. ​२. सावंतवाडी ​- सावंतवाडी तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर शेतजमीन व इतर जमिनी संपादित केल्या जाणार आहेत: ​केगद: गट क्र. ९७ (६.०१ हे.), ९९ (४.३७ हे.), ६६ (२.९० हे.), ६४ (८.८१ हे.) व इतर अनेक गट समाविष्ट आहेत. ​उडेली: गट क्र. २३ (५.४८ हे.), २४ (५.८९ हे.), २५ (४.३४ हे.), २७ (७.६१ हे.). ​नेने : गट क्र. १५ (५.२५ हे.), १४ (२.७९ हे.). ​फणसवडे : गट क्र. १३ (५.९२ हे.), ९ (५.२१ हे.), ५७ (४.१६ हे.), १५ (६.३८ हे.), ५६ (६.०० हे.) इत्यादी. ​घाडप व दाभिल: घाडप गट ६९ (१.४९ हे.), तर दाभिल गट ९ हा ११.०९ हेक्टरचा मोठा भूखंड समाविष्ट आहे. ​आसणिये : गट क्र. १५ (२.४९ हे.), १३ (५.५२ हे.), १२ (२.९६ हे.), ७७ (७.०० हे.). ​पडवे माजगाव : गट क्र. ४२ (४.६७ हे.), ४४ (१.२८ हे.), ४३ (७.९८ हे.), ७ (७.१८ हे.). ​डेगवे : गट क्र. ६७ (०.७२ हे.), ९१ (६.४९ हे.), ९८ (२.९५ हे.), ९९ (२.८७ हे.). बांदा : गट क्र. १६१ (१.१० हे.), १६२ (२.३२ हे.), १५५ (२.४४ हे.), १५३/A (१.०७ हे.), १६६ (६.४२ हे.), १५१ (८.३५ हे.), १४९ (५.६७ हे.), १७१ (३.९२ हे.) इत्यादी मोठ्या प्रमाणावर जमिनी समाविष्ट आहेत.

टाईम्स स्पेशल

या अधिसूचनेत नमूद केलेल्या जमिनींबाबत ज्या व्यक्तींचे हितसंबंध गुंतलेले आहेत, त्यांनी या विज्ञापनाच्या प्रसिद्धीपासून २१ दिवसांच्या आत आपल्या हरकती अधिकृत पुराव्यांसह उपविभागीय अधिकारी, सावंतवाडी यांच्याकडे नोंदवणे आवश्यक आहे. मुदतीनंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg