loader
Breaking News
Breaking News
Foto

0 ते 5 वयोगटातील बालकांना पल्स पोलीओचे डोस चा लाभ द्या - तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे

संगलट (खेड)(प्रतिनिधी) - दापोली आरोग्य विभागाच्यावतीने 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामीण भागामध्ये 6 हजार 141 बालकांना ‘दोन थेंब पोलीओचे’ डोस देण्यात येणार आहे. यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच आरोग्य विभागाकडून गावामध्ये अंगणवाडी असे ग्रामीण भागांमध्ये 168 बूथ तयार करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा कार्यक्रम सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपल्या नजीकच्या बुथवर सुरू असणार आहे. शिवाय यासाठी ग्रामीण भागांमध्ये 346 कर्मचारी व 34 पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचे दोन थेंब डोस पाजायचे आहेत.

टाईम्स स्पेशल

या पल्स पोलिओ अभियानासाठी दापोली आरोग्य विभाग, दापोली उपजिल्हा रूग्णालय आपल्या आरोग्य पथकासह सज्ज झाले आहे. तरी पल्स पोलिओमुक्त भारताच्या अभियानात सहभाग होवून लाभार्थी बालकांना डोस देण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमित वंजारे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg