loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत २५ जून रोजी आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांचे तीव्र धरणे आंदोलन; कर्जमाफी आणि हेक्टरी ५ लाख भरपाईची मागणी

​रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांपासून पाठीस लागलेली नैसर्गिक आपत्ती, शासनाचे शून्य नियोजन आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे मेटाकुटीला आलेल्या कोकणातील आंबा, काजू आणि मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध आता पूर्णपणे सुटला आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि आपल्या न्याय्य मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आगामी गुरुवार, दिनांक २५ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरीतील ऐतिहासिक जयस्तंभ चौकात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक भव्य आणि तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश उर्फ बावा साळवी यांनी एका पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला दीपक उपळेकर, अशोक भाटकर, सदाशिव पाचकुडे आणि राजूशेठ रामगडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. ​पत्रकार परिषदेत बोलताना बावा साळवी यांनी कोकणातील शेतकऱ्यांची अत्यंत विदारक स्थिती मांडली. सन २०१५ पासून कोकणाला लागलेली नैसर्गिक संकटांची मालिका, अवकाळी पाऊस, चक्रीवादळे आणि कमालीची उष्णता यामुळे येथील मुख्य पिके धोक्यात आली आहेत.

टाईम्स स्पेशल

चालू हंगामात तर केवळ २० टक्के सुद्धा उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आलेले नाही, ही वस्तुस्थिती शासकीय सर्वेक्षणातही स्पष्ट झाली आहे. असे असूनही शासन आंबा व काजू पिकांना स्थिर दर किंवा हमीभाव देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सध्या शासनाकडून प्रतिझाड अवघी २२० रुपये मदत देण्याची जी चर्चा सुरू आहे, ती म्हणजे महागाईच्या या युगात शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी क्रूर थट्टा असून, ती आम्हाला पूर्णपणे अमान्य आहे. शासनाने हे तात्काळ थांबवून सर्व शेतकर्‍यांना प्रतिहेक्टरी ५ लाख रुपये सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मुख्य मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg