loader
Breaking News
Breaking News
Foto

पर्जन्यवृष्टीसाठी खेडमध्ये शिवभक्तांचा जांभळेश्वराला जलाभिषेक

खेड - खेडमधील सकल हिंदू समाज आणि शिवभक्त समितीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत खेडजाई रेडजाई मातेचा आशीर्वाद घेऊन, जांभळेश्वराच्या चरणी पर्जन्यवृष्टीचं साकडं घातलं. जांभळेश्वराच्या पिंडीला जलाभिषेक करून त्याला प्रतिकात्मक स्वरूपात पाण्यात कोंडलं. आणि भक्तांच्या हाकेला प्रतिसाद देण्याचं कळकळीचं आवाहन केलं! खेडजाईचे पुजारी दिलीप मोकाशी यांनी जांभळेश्वराला भक्त मंडळींनी अर्पण केलेला हातभेटीचा नारळ स्वीकारण्याची आणि त्यांच्या आर्त आवाहनाला, लवकरात लवकर पाऊस देऊन, प्रतिसाद देण्याची विनंती केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जांभळेश्वर महादेव अशा आवाहनाला प्रतिसाद नक्की देतात, असा आजवरचा इतिहास आहे असा मोकाशी यांचा अनुभव असल्याचे सांगतात. गणपती, महादेव, दुर्गामाता, हनुमान या सर्व देवताना आरतीद्वारे आवाहन करून कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रमाला विविध स्तरातून मान्यवर आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. पाण्याचे दुर्भिक्ष लवकरात लवकर संपुष्टात यावे म्हणून खेडमधील समस्त बांधवांनी आपापल्या परीने महादेवाला साकडे घालावे, अशी शिवभक्त समिती आणि सकल हिंदू समाज यांच्या वतीने कळकळीची विनंती करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

या प्रसंगी अनिकेत कानडे, संजय बुटाला, दिलीप मोकाशी, उल्हास बाळ, सुहास सोहनी, अ‍ॅड. अमेय मालशे, राकेश पाटील, रमेश वणकर, जयंत शेठ, मुंबई उच्च न्यायालयातील सरकारी वकील प्रसन्न मालशे, मयूर सातपुते, गणेश भोसले, अनिल सदरे, दीपक पाटणे, ओंकार पाटणे, सचिन चव्हाण, माधव जोशी, नामदेव देवळेकर, धर्मेश पवार यांच्यासह शिवभक्त समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि सकल हिंदु बांधव उपस्थित होते .

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg