loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबोली मुख्य धबधबा परिसरात कोसळले भलेमोठे दगड

सावंतवाडी : आंबोली घाटात मुख्य धबधबा परिसरात दगड रस्त्यावर कोसळले. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही. वर्षा पर्यटनाला सुरूवात झालेली असताना घडलेल्या या घटनेमुळे पर्यटकांत भिती निर्माण झाली आहे. आंबोली घाटात मुख्य धबधब्याच्या परिसरात हे दगड कोसळले. यामुळे काही काळ रस्ता बंद झाला होता. येथील उपस्थितांनी रस्त्यावरील हे दगड बाजूला केला असून वाहतूक सुरळीत करण्यात आल्याची माहिती गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही दरडग्रस्त भागात दक्षता घेण्याबाबतचा स्पॉट पंचनामा नुकताच करण्यात आला होता. यात संबंधित विभागाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे आज दगड रस्त्यावर कोसळण्याचे पहायला मिळत आहे. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही. मात्र, वर्षा पर्यटनासाठी विकेंडला आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg