loader
Breaking News
Breaking News
Foto

वरुणराजाला साकडे घालण्यासाठी म्हसळ्यात भजन किर्तनासह दिंडी

म्हसळा : रायगड जिल्ह्यासह म्हसळा तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने पाण्याची टंचाई, शेतकरी राजा चिंतेत, यंदा जुन महिन्यातील मृग नक्षत्र गेला तरी पाऊस पडण्याचा चिन्ह दिसत नाही, गेल्या वर्षी मे महिन्यापासुनच पावसाने हजेरी लावली असली तरी यावेळे मात्र पावसाने दडी मारली असल्याने पाऊस कधी पडणार याची वाट पाहत आहेत. पाऊस पडुन शेतकरी राजा चिंतातुर व्हावा, पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी, दुष्काळाचे संकट टळावे, पिके जळुन जाऊ नयेत यासाठी म्हसळा शहरातील हिंदू ग्रामस्थ मंडळाच्या वतीने भजन, किर्तन करून वरुणराजाला साकडे घालण्यासाठी दिंडीचे आयोजन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लखमेश्वर गाभारा पाण्याने भरून वरुणराजाला आर्त साद घालून पाऊस पडण्यासाठी गा-हाणे मांडण्यात आले. या वेळी म्हसळा शहरातील असंख्य ग्रामस्थ यांच्यासह पि. एम. श्री म्हसळा शाळेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg