मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अभूतपूर्व उलथापालथ सुरू असतानाच, आज (१९ जून) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ६० वा वर्धापन दिन सोहळा सायन येथील ऐतिहासिक 'षण्मुखानंद सभागृहात' पार पडत आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांवर तसेच भाजपवर सडकून टीका केली आहे. तसेच आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली, असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले, खंडोजी खोपडे नाव घेतल्यावर तुम्ही काय म्हणता? गद्दार! हे ज्यांनी विचारले होते, त्यांनाच विचारा की आता त्यांचे हे डाग पुसायला किती वर्ष लागतील? आज अचानक वाटायला लागले की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल. शिवसेना विलीन होत नसते. काँग्रेसने देखील आपल्याला त्रास दिला आहेच. अगदी टोकाचे वैर होते. भाजप आपल्यासोबत होता म्हणून आपण ते वैर स्वीकारले होते. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचे वार झेलेले होते. या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून गेलात? बाबरी पाडल्यानंतर देखील बाळासाहेब ठाकरे आरोपी क्रमांक 2 होते.पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, काँग्रेसने देखील आपली माणसं फोडली. पण त्यांनी मुख्यमंत्री कोणाला केले नाही. काँग्रेसने कधी मातोश्रीवर डोळे उगारले नव्हते. पण भाजप शिवसेनेला मुळासकट उपटून काढायला निघाली आहे.शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी अटी आणि आमदार खासदार विकत घ्यायला अटी नाहीत?उद्धव ठाकरे म्हणाले, किती फोडाफोडी करता? कशासाठी? दोन अडीच लाख सीमा सुरक्षा दल घुसवले पश्चिम बंगालमध्ये, कशासाठी तिथे एका महिला मुख्यमंत्र्यांना हरवण्यासाठी. जर तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी सुरक्षा दल पाठवता, तर मणिपूरमध्ये, जम्मूमध्ये का नाही पाठवत? आम्ही पाकिस्तानमधून नाही आलो, आम्ही तुमच्या पेक्षा जास्त देशप्रेमी आहोत. हे गोमूत्रधारी लोक बोकळले आहेत. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, शेंडी जाणव्याचे नाही. मशाल वेगळी ठेवा आणि भगवा वेगळा ठेवा. उद्धव ठाकरे म्हणाले, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शिव-फुले शाहू आंबेडकरांचा आहे. आहेच. शिवाजी महाराजांच्या काळातही गद्दार होतेच. प्रबोधनकार ठाकरेंना सुद्धा भोगावे लागले आहे, का? तर कर्मठ आणि ब्राह्मणी वृत्ती. घराचा पत्ता नाही, कुटुंब घेऊन महाराष्ट्रभर फिरले.उद्धव ठाकरे म्हणाले, किती फोडाफोडी करता? कशासाठी? दोन अडीच लाख सीमा सुरक्षा दल घुसवले पश्चिम बंगालमध्ये, कशासाठी तिथे एका महिला मुख्यमंत्र्यांना हरवण्यासाठी. जर तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी सुरक्षा दल पाठवता, तर मणिपूरमध्ये, जम्मूमध्ये का नाही पाठवत? आम्ही पाकिस्तानमधून नाही आलो, आम्ही तुमच्या पेक्षा जास्त देशप्रेमी आहोत. हे गोमूत्रधारी लोक बोकळले आहेत. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, शेंडी जाणव्याचे नाही. मशाल वेगळी ठेवा आणि भगवा वेगळा ठेवा.
उद्धव ठाकरे म्हणाले, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शिव-फुले शाहू आंबेडकरांचा आहे. आहेच. शिवाजी महाराजांच्या काळातही गद्दार होतेच. प्रबोधनकार ठाकरेंना सुद्धा भोगावे लागले आहे, का? तर कर्मठ आणि ब्राह्मणी वृत्ती. घराचा पत्ता नाही, कुटुंब घेऊन महाराष्ट्रभर फिरले. एखाद्या गावी गेल्यावर कुठे आश्रय मिळाला तर आजी तिथे संसार मांडायचे. अनेकवेळेला आमच्या घरावर मेलेली कुत्री आणि कचरा फेकला गेला आहे. आज माझ्यावर टीका होते, माझ्या पत्नीवर टीका होते, आदित्यवर टीका होते, का? हा जळफळाट आहे. मुख्यमंत्री झालो होतो म्हणून. पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आमच्या कुटुंबावर जेव्हा हल्ले झाले तेव्हा या गदढ्यांपैकी एक तरी आला होता का? आज ज्या लोकांनी गद्दारी केली आहे त्यांच्या मतदारसंघाची मी जाहीर माफी मागतो. तेव्हा मोदींचा चेहरा न वापरता केवळ बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या प्रचारांमुळे निवडून आले आहेत.उद्धव ठाकरे म्हणाले, एक लक्षात घ्या आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, स आमच्यासाठी जन्माला आली आहे. त्यावेळेला रजनी पटेल हा शिवसेनेच्या मुळावर उठला होता. तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना सही करायला लावली होती, तेव्हा त्यांनी पत्र फेकून दिले आणि ज्या क्षणी माझ्या अंगाला हात लावशील तेव्हा तुझी प्रेत यात्रा निघालेली असेल. पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, ही अशी वेळ आली आहे. आहे कुठे तो भाजप? दोन तृतीयांश मेजोरिटी अजिबात नाही. सगळी इकडचे तिकडचे आहेत. कोणीतरी त्यांना म्हटले होते, तुम्हाला पोरं होत नाहीत, तर आमची पोरं का पळवताय? किती घेऊन जाल तुम्ही? आणि काय उद्धव ठाकरे कोणाला भेटत नाहीत, उद्धवजी नाही तर आदित्य ठाकरे यांनी भेटले पाहिजे. अरे मी जर फिरत नव्हतो तर तू निवडून कसा आला? मी जर असे म्हटले की मी तुला खासदार केले, मी तुला मंत्री केले, मी जर असे म्हटले तर? वड मोठा असतो, त्याला पारंब्या असतात... कोणी नमस्कार केला की पारंबीला वाटतं मलाच नमस्कार केला. नमस्कार तुला नाही, त्या वडाला, खोडाला केलेला असतो.भाषणाच्या शेवटी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, माझ्यावर होणारे आरोप जर तुम्हाला मान्य असतील तर आत्ता मी पक्ष प्रमुख पदावरून पायउतार व्हायला तयार आहे. जे आरोप माझ्यावर होत आहेत आणि ते जर तुम्हाला खरे वाटत असेल तर आत्ता मी पायउतार व्हायला तयार आहे. मला नेतृत्वाची हाव नाही. पण कोणी लाचार माणूस माझ्यावर आरोप करत असेल तर त्याला उत्तर तुम्ही द्यायचे आहे. अनेक संकट आले, अनेक वादळ आले, मी डगमगणारा नाही.







































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.