loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प. शाळा पूर्णगड शाळा नं.१ शाळेत प्रवेशोत्सव उपक्रम उत्साहात

रत्नागिरी - जि. प. आदर्श शाळा पूर्णगड नं.१ ता. जि. रत्नागिरी या शाळेत शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात सुरुवातीला ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून शाळा प्रवेश जनजागृती करण्यात आली. तद्नंतर नवागतांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेश यांचे वाटप करण्यात आले. शाळा पूर्वतयारी मेळावा क्र. २, पहिले पाऊल या उपक्रमांचेही आयोजन उत्साहात करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमाला पंचायत समिती गावखडी गणाच्या स्वाती शिंदे, केंद्रप्रमुख महेश तोडणकर, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ यांची उपस्थिती लाभली. स्वाती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. गोखले ट्रस्ट पुणे यांच्याकडून मोफत वहयांचे वाटप करण्यात आले. संतोषी पाथरे पोलीस पाटील पूर्णगड यांच्याकडून स्कूल बॅग व कंपास पेटया साहित्याचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले. बागवे यांच्याकडून वहयांचे वाटप करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वाकडे, शिक्षक- भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, तृप्ती शिरगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाविषयी शिक्षण विस्तार अधिकारी बीट पावस आदरणीय हिरवे यांनी समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg