loader
Breaking News
Breaking News
Foto

एस एच १०३ रस्त्याच्या रुंदीकरणाला मिळाला हिरवा कंदील; आमदार महेश बालदी यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : द्रोणागिरी नोड येथील जेएनपीए टाउनशिप गेटसमोरील राज्य महामार्ग क्रमांक १०३ (एस एच १०३) रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला अखेर गती मिळाली असून आमदार महेश बालदी यांनी सिडकोकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे. त्यानुसार उरण उरण रेल्वे स्टेशनपासून बोकडविरा ते जेएनपीए टाऊनशिप गेट समोरील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. द्रोणागिरी नोड, जेएनपीए बंदर, औद्योगिक क्षेत्र तसेच टाउनशिपकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र, रस्ता अरुंद असल्याने या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषतः अवजड वाहनांच्या मोठ्या प्रमाणातील वर्दळीमुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. या समस्येची गंभीर दखल घेत आमदार महेश बालदी यांनी संबंधित शासकीय विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत संबंधित विभागाने अखेर या कामासाठी सकारात्मक निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर वाहतुकीची क्षमता वाढणार असून कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

टाईम्स स्पेशल

तसेच अपघातांचे प्रमाण घटून जेएनपीए बंदर आणि औद्योगिक क्षेत्राकडे होणारी वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होणार आहे. या निर्णयाचे स्थानिक नागरिक, व्यापारी वर्ग आणि वाहनचालकांनी स्वागत केले असून दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याबद्दल आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले आहेत. सिडकोकडून संबंधित कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg