दोडामार्ग, दि. २० जून प्रतिनिधी : विर्डी येथील वझर सखल धबधब्यात गुरुवारी बुडून मृत्यू झालेल्या विजय दोडमणी (23 ) या युवकाचा मृतदेह शनिवारी तिसऱ्या दिवशी सह्याद्री ॲडव्हेंचर व बाबल अलमेडा टीमला तीन तासांच्या अथक प्रयत्ना नंतर मृतदेह वाहेर काढण्यात यश आले यावेळी मृतदेहच्या नातेवाईकांना व मित्र परिवाराच्या अश्रूंना बांध फुटला. त्यानंतर डोंगर, खडकातून तीन तास पायी चालत मृतदेह गाडी पर्यत आणला. तेथून दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला .
विर्डी येथील वझर सखल धबधब्यात कर्नाटक धरवाड येथील 7 युवक मौज मजा व अंघोळ करण्यासाठी आले होते. अंघोळ करत असताना विजय दोडमणी हा युवक त्या खोल डोहात बुडाला व बेपत्ता झाला होता. शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सिंधुदुर्गातील सह्याद्री ॲडव्हेंचर आणि बाबल आलमेडा टीम त्या धबधब्या च्या ठिकाणी दाखल झाली होती. व त्या ठिकाणी असलेल्या खोल डोहात त्यांनी ड्रोन कॅमेरा सोडून साधर 1 तास मृतदेहचा शोध घेतला होता. अथक प्रयत्न शर्थीत मृतदेह ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला. उपलब्ध साधन सामुग्रीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याच्या प्रयत्न केला मात्र यश आले नाही आणि संध्याकाळची वेळ आणि काळोख झाल्याने या टीमने रेस्क्यू ऑपरेशन थांबविले. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी 9.30 वाजता पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले उपलब्ध साधनसामुग्रीच्या मदतीने मृतदेह काढण्यास सुरुवात केली. धबधब्याचा तीव्र प्रवाहामुळे नृतदेह हाती लागत नव्हता मात्र तीन तासांच्या प्रयत्नानंतर अखेर मृतदेह हाती लागला. तो मृतदेह बाहेर काढता क्षणी उपस्थित ग्रामस्थ सर्वांनीच नाकावर हात धरला कारण तो मृतदेह 3 दिवस झाल्याने कुजेल्या अवस्थेर होता. त्याच्या नातेवाईकांना अश्रूचा बांध फुटला.
सकाळी 9.30 वाजता मृत देह बाहेर काढण्याचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. 9.30 ते 12.30 च्या कालावधीत मृतदेह काढण्यात यश आले. त्या नंतर पुढचे तीन तास मृतदेह डोंगर दगदडातून मुख्य रस्त्या पर्यँत आणताना अनेक अडचणीना सोमोरे जावे लागले.






















































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.