loader
Breaking News
Breaking News
Foto

विधान परिषदेच्या ११ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे मतदान सुरु, सत्ताधारी व विरोधक यांच्यात चुरस

मुंबई: सत्ताधारी आणि विरोधक यांच्यासाठी अत्यंत लक्षवेधी निवडणूक सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या ११ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या जागांसाठी आज मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरू झाली असून मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीकडे राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिले जात आहे.या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या महायुतीसमोर काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या महाविकास आघाडीचे आव्हान आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्य हे मतदार असल्याने जिल्हानिहाय राजकीय ताकद आणि स्थानिक समीकरणे निर्णायक ठरणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जळगाव, सोलापूर, सांगली-सातारा, नागपूर, नांदेड, परभणी-हिंगोली, भंडारा-गोदिंया, अमरावती, नाशिक, धाराशिव-बीड-लातूर, छत्रपती संभाजीनगर-जालना, अमरावती, येथे आज विधान परिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडेल. ठाणे, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, यवतमाळ, पुणे, अहिल्यानगर, वर्धा या ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. राज्यात नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे यश मिळाले होते. अनेक जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समित्यांमध्ये महायुतीचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या या निवडणुकीतही महायुतीला संख्या बळाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

टाईम्स स्पेशल

या निवडणुकीत नागपूर, अमरावती, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, परभणी-हिंगोली, धाराशिव-लातूर-बीड आणि छत्रपती संभाजीनगर-जालना यांसारख्या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक ठिकाणी काट्याची टक्कर अपेक्षित आहे, तर काही मतदारसंघांत महायुतीला स्पष्ट आघाडी असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक विकासकामे, निधी वाटप, नगरपालिकांमधील सत्तासमीकरणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी हे प्रमुख मुद्दे प्रचारात केंद्रस्थानी राहिले. दोन्ही आघाड्यांनी आपल्या मतदारांवर पकड मजबूत ठेवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg