loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण : सावर्डेचे महसूल अधिकारी यांच्या हुकमशाही कारभाराविरुद्ध आमदार शेखर निकम यांच्याकडे तक्रार

चिपळूण - तालुक्यातील सावर्डे येथील महसूल विभागाचे मंडळ अधिकारी यांच्या मनमानी आणि दादागिरीच्या कारभाराविरोधात चिपळूण-संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभाग प्रमुख प्रणय प्रकाश चव्हाण यांनी ही तक्रार केली असून, संबंधित अधिकाऱ्याची त्वरित चौकशी करून त्यांची बदली करण्याची मागणी केली आहे. या संदर्भातील तक्रार पत्र आमदार शेखर निकम यांच्या कार्यालयाकडून स्वीकृत करण्यात आले आहे. सावर्डे हा शैक्षणिक हब असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नागरिक उत्पन्न दाखले, संमती पत्र, प्रतिज्ञापत्र व इतर महसुली कामांसाठी येतात. मात्र, मंडल अधिकारी हे कामात जाणीवपूर्वक त्रुटी काढून लोकांना चकरा मारायला लावतात, असा आरोप पत्रात करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते स्वतः तहसीलदार असल्याच्या अविर्भावात वागत असून महा ई-सेवा केंद्र चालक आणि स्थानिक जनतेवर दादागिरी करत आहेत. आर्थिक देवाणघेवाण साधण्यासाठीच हा त्रास दिला जात असल्याचा थेट आरोप तक्रारदाराने केला आहे. फेरफार नोंदी, सातबाऱ्यावर नाव नोंदवणे, वारस तपास यांसारख्या कामांमध्ये आपल्या अपेक्षेनुसार आर्थिक व्यवहार होत नसल्याने ते जनतेला नाहक त्रास देत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सावर्डे सर्कल अंतर्गत दहिवली खुर्द, बुद्रुक, हडकणी, डेरवण, फुरुस अशी मोठी गावे येतात. एवढे मोठे कार्यक्षेत्र असतानाही अधिकारी हे सावर्डे येथील कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. त्यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg