मालवण (प्रतिनिधी) - कांदळवन दक्षिण कोकण, कांदळवन वनपरिक्षेत्र मालवण आणि रीफ वॉच मरीन कन्झर्वेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कासव दिनाचे औचित्य साधत मालवण दांडी येथे तात्पुरते सागरी कासव व सागरी वन्यजीव उपचार केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. हे उपचार केंद्र दांडी आवार येथील मत्स्यव्यवसाय विभाग प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये स्थापित करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवर समुद्री कासव संवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. जखमी कासवे अनेकदा सापडून येत कासवांच्या उपचारासाठी व्यवस्था निर्माण व्हावी अशी मागणी होत होती. ही गरज ओळखून कांदळवन विभाग व रीफ वॉच मरीन कन्झर्वेशन, गोवा या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दांडी येथे तात्पुरत्या उपचार केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.
या उपचार केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी कांदळवन विभाग मालवणचे वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव शिंगाडे, कांदळवन मालवणचे वनपाल सत्यवान सुतार, वेंगुर्ला वनपाल सुनिल सावंत, आचरा आणि देवलीचे वनरक्षक, तालुका पशुवैद्यकीय चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुधीर कानसे, मत्स्यव्यावसाय प्रशिक्षण अधिकारी र. ग. मालवणकर, रिफ वॉचचे अर्जुन त्रिकन्नाद, युएनडीपीचे शुभम सावंत, दक्षिण फाउंडेशनच्या स्नेहा गामरे, प्रियांका वायंगणकर, अनिकेत बोधले, केदार पालव, निलक्रांती संस्थेचे अध्यक्ष व नगरसेवक रविकिरण तोरसकर, वाईल्ड लाईफ रेस्क्युअरच्या सल्लागार सौ. शिल्पा खोत, वनशक्ती संस्थेचे यथार्थ खवणेकर, युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या अध्यक्षा मेगल डिसोझा, सदस्य अक्षय रेवंडकर, दर्शन वेंगुर्लेकर, भार्गव खराडे, तसेच हरी खोबरेकर, सन्मेष परब, स्कुबा डायवर भूषण जुवाटकर, वाईल्ड लाईफ रेस्क्युअर, सिंधुदुर्ग, दक्षिण फाउंडेशन वा इकोमेट्स ग्रुपचे सदस्य, कांदळवन प्रतिष्ठान उपाजीविका तज्ञ सिंधुदुर्ग प्रकल्प समन्वयक, प्रकल्प सहाय्यक, दिलासा जनविकास प्रतिष्ठान प्रकल्प समन्वयक, कासव मित्र, स्थानिक मच्छिमार व स्कुबा ड्रायवर्स, वनमजूर आदी उपस्थित होते.
या उपचार केंद्राबाबत मालवण मधील पर्यावरण प्रेमी, प्राणी प्रेमी व समुद्री जीव राक्षणासाठी काम करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. या तात्पुरत्या उपचार केंद्राचा जास्तीत जास्त वापर करून घ्यावा आणि सागरी कासव व सागरी वन्यजीवांचे संरक्षण करावे. नागरिकांनी सागरी कासव व वन्यजीव संबंधित उपचार, माहिती व सहकार्यासाठी वनपरिक्षेत्र कांदळवन, मालवण ०२३६५ - २५२२६० व वनपाल मालवण - ९६०४०२२७३८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कांदळवन विभागाकडून करण्यात आले.



















































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.