loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा स्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

खेड - खेड तालुक्यातील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनियर कॉलेज (सी.बी.एस.ई.) वेरळ मध्ये रविवार दिनांक २१ जून २०२६ रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असून तो आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. याचे औचित्य साधून श्री समर्थ कृपा विद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

योगा केल्याने फक्त आपले शरीर निरोगी राहत नाही तर योगा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. याविषयी महत्वपूर्ण माहिती देण्यात आली. इ.नर्सरी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी प्रशालेतील योग शिक्षिका रसिका पालांडे व भक्ती घडशी यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्व पटवून दिले आणि विविध योगासनाची माहिती प्रत्यक्ष कृतीद्वारे करून दाखविली.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ एस.एस.अली, प्रशालेचे सीईओ विजय रॉबर्ट, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg