loader
Breaking News
Breaking News
Foto

एमएचटी - सीईटी पी.सी.बी. परीक्षेत रोटरी स्कूलचे दैदिप्यमान यश

खेड (प्रतिनिधी) - एमएचटी - सीईटी ( MHT-CET ) पी.सी.बी. ग्रुप परीक्षेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल खेडमधील तब्बल 75 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेनटाईल गुण प्राप्त करून संपूर्ण जिल्ह्यात आपल्या शाळेचे नाव गौरवित केले आहे. इयत्ता 12 वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी व ॲग्रीकल्चर यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सदर एमएचटी - सीईटी परीक्षा ऑनलाईन रित्या घेतली जाते. यावर्षीही (MHT-CET) या परीक्षेत रोटरी स्कूलच्या PCB ग्रुपच्या विद्यार्थ्यांमधील एकूण 75 विद्यार्थ्यांनी 90 पेक्षा अधिक पर्सेनटाईल तर 101 विद्यार्थ्यांनी 80 पेक्षा अधिक पर्सेनटाईल गुण मिळिवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

(MHT-CET) PCB परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये तनिशा चव्हाण - 99.92 पर्सेनटाईल, समृद्धी लवेकर - 99.89 पर्सेनटाईल, ध्यानी पटेल - 99.85 पर्सेनटाईल, इशा पवार - 99.83 पर्सेनटाईल, प्रक्षालिनी नायकवडे - 99.80 पर्सेनटाईल, ओम तोडकरी - 99.77 पर्सेनटाईल, अनुश्री सागर - 99.53 पर्सेनटाईल, इरा कदम - 99.52 पर्सेनटाईल, हर्ष टेमकर - 99.47 पर्सेनटाईल, सानिका आग्रे - 99.40 पर्सेनटाईल, वरद जाधव - 99.38 पर्सेनटाईल, गार्गी मयेकर - 99.36 पर्सेनटाईल, श्रेया गुरसळे - 99.35 पर्सेनटाईल, इकसनूर कौर परमजित सिंग - 99.33 पर्सेनटाईल, सृष्टी टेटांबे - 99.31 पर्सेनटाईल, धनश्री लंबाडे - 99.24 पर्सेनटाईल, मनस्वी ताठरे - 99.15 पर्सेनटाईल, पार्थ मोरे - 99.13 पर्सेनटाईल, चिन्मयी महाकाळ - 98.96 पर्सेनटाईल, सबिरा तिसेकर - 98.85 पर्सेनटाईल, संजना साळवी 98.62 पर्सेनटाईल, शर्ली परदेशी - 98.57 पर्सेनटाईल, सई कोटकुंडे - 98.44 पर्सेनटाईल, सूरज आवेरे - 98.31 पर्सेनटाईल, अनुष्का जैन - 98.26 पर्सेनटाईल, रुची भोसले - 98.05 पर्सेनटाईल, माही करजीवकर - 97.92 पर्सेनटाईल, निरजा खेडेकर - 97.69 पर्सेनटाईल, आर्या घाडीगावकर - 97.68 पर्सेनटाईल, श्रावणी बांगल - 97.22 पर्सेनटाईल, स्वरा पवार - 97.22 पर्सेनटाईल, साजिरी परुळेकर - 97.21 पर्सेनटाईल, श्रावणी गवळी - 97.13 पर्सेनटाईल व संचित पड्ये - 97.03 पर्सेनटाईल यांनी 97 पर्सेनटाईल पेक्षा अधिक गुण मिळवून यश प्राप्त केले.

टाईम्स स्पेशल

वरील सर्व विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत रोटरी स्कूलची यशोगाथा कायम राखली आहे. एमएचटी - सीईटी- पी.सी.बी. परीक्षेमध्ये संपूर्ण कोकणात भरघोस यश मिळवणारी रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूल ही एकमेव ठरलेली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमेस्ट्री, बायोलॉजी या विषयांचे शिक्षक, वर्गशिक्षक, परीक्षा विभागातील शिक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी (MHT-CET) PCB परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg