जाणवळे (सागर गोवळे) : आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा, जाणवळे नं. १ येथे जागतिक योगदिन अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह. यावेळी मुख्याध्यापिका घोरपडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप कोंडविलकर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुलांना योगशास्त्राचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील त्याची आवश्यकता यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीसोबतच मानसिक एकाग्रता कशी वाढते, हे सोप्या भाषेत पटवून देण्यात आले. निरोगी आयुष्यासाठी नियमित योगसाधना करणे ही काळाची गरज असल्याचे सांगत उपस्थितांनी विद्यार्थ्यांना दररोज योगाभ्यास करण्याचे आवाहन केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध योगासने करून या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण होते.




















































































.jpg)

.jpg)









































































































































.jpg)



























































































































































.jpg)








































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.