loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ प्राध्यापक व मालवणी कवी डॉ. नामदेव गवळी यांचे निधन

वैभववाडी (प्रतिनिधी)- प्रसिद्ध मालवणी कवी तथा आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे प्रज्ञावंत, विद्यार्थिप्रिय, मृदू स्वभावाचे जेष्ठ प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख, प्रभारी प्राचार्य डॉ. नामदेव गवळी यांचे वयाच्या ५८ वर्षी आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. महाविद्यालयाच्या स्थापना सन १९९२ पासून डॉ. गवळी सक्रियपणे कार्यरत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कॉलेजच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. सरांचा माजी विद्यार्थी वर्ग मोठा आहे. त्यांच्या मालवणी बोली काव्याला, विशेषत भातालय या काव्यसंग्रहाला नामांकित संस्थानी गौरविले होते. ङ्ग गेली काही वर्ष कॉलेजचे उप प्राचार्य, प्रभारी प्राचार्य अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी समर्थपणे सांभाळ्ल्या होत्या. रोटरी क्लब वैभववाडीचे सक्रिय सदस्य व सचिव होते.ङ्ग डॉ. गवळी सरांच्या रूपाने एक आदरणीय विद्यार्थिप्रिय, संयमशील व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलेची भावना व्यक्त होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg