loader
Breaking News
Breaking News
Foto

पीएमश्री वेळणेश्वर प्रशालेत "शाळाप्रवेशोत्सव" उत्साहात

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर पिएम श्री शाळा वेळणेश्वर उज्ज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल!" या संदेशाला साजेसा शाळा प्रवेशोत्सव सोहळा पीएमश्री स्कूल वेळणेश्वर नं. १, ता. गुहागर येथे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हा परिषद रत्नागिरीच्या सदस्या सन्माननीय नेत्राताई ठाकूर यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रवेशोत्सवानिमित्त नवागत विद्यार्थ्यांची सजविलेल्या चारचाकी वाहनातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात निघालेली ही प्रवेश दिंडी गावकऱ्यांचे विशेष आकर्षण ठरली. दिंडीत सहभागी झालेली ‘शिक्षण पालखी’ सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी राबविण्यात आलेल्या ‘पहिले पाऊल’ या अभिनव उपक्रमांतर्गत नवागत विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन ते पालकांना स्मृतिचिन्ह म्हणून प्रदान करण्यात आले. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रवासाच्या पहिल्या पावलांची ही अविस्मरणीय आठवण पाहून पालक भारावून गेले. यानंतर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य, गणवेश तसेच गोड खाऊचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवत होता. या प्रसंगी केंद्रीय प्रमुख विश्वास खर्डे, अंगणवाडी पर्यवेक्षिका माटल, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गावणंग, उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतीश नलावडे, पत्रकार उमेश शिंदे, समिती सदस्य विश्वजीत जामसुतकर, नरेंद्र ठाकूर, श्वेता धोपावकर तसेच सर्व शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

सदर कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उच्चश्रेणी मुख्याध्यापक सतीश नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर शिक्षक बिपिन विचारे, उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर, सुलक्षणा करडे, भारती गोवेकर, शिक्षण सेविका प्रियंका पवार, अंजुम शेख आणि तेजस्विनी जगताप यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बाबासाहेब राशिनकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg