loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली शाळा नं.२ व अंगणवाडी शिंदेवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली शाळा नं.२ व अंगणवाडी शिंदेवाडी येथील विद्यार्थ्यांना गुरुवारी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला वरवेली ग्रामपंचायत सरपंच नारायण आगरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ शिंदे, पत्रकार गणेश किर्वे, जितेंद्र विचारे, नामदेव रावणंग, बाबाजी अवेरे, शाळेचे मुख्याध्यापक मनोज नाखरे, अंगणवाडी सेविका श्वेता शिंदे, लवकुश जुवारे तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी वरवेली मराठवाडी येथील दानशूर ग्रामस्थ प्रदीप एकनाथ विचारे व कुटुंबीय यांच्यावतीने शाळा नं.२ व अंगणवाडी शिंदेवाडी येथील विद्यार्थ्यांना दप्पर, वह्या, टीशर्ट, टोपी असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शाळा व अंगणवाडी यांच्या वतीने प्रदीप एकनाथ विचारे व कुटुंबीय यांचे तसेच जितेंद्र विचारे यांचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg