loader
Breaking News
Breaking News
Foto

जलजीवनच्या अपुऱ्या योजना पूर्णत्वाकडे कशा जातिल याचं नियोजन आम्ही करत आहोत: सभापती प्रणव पोळेकर

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - ज्या काही रिवाईस योजना आहेत त्या पूर्णत्वाकडे जाण्यासाठी त्यामध्ये काहीतरी त्रुटी होत्या त्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदार यांच कॉम्बिनेशन होत नव्हतं त्यामध्ये काही ग्रामस्थांच्याही शंका होत्या. यामध्ये जी गॅप होती ती गॅप भरून काढण्यासाठी आम्ही पंचायत समितीने पुढाकार घेतला. गावागावात आणि पंचायत समितीमध्ये या संदर्भात बैठका घ्यायच्या आम्ही ठरवले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरुवातीला जानवळे आणि पाठपन्हाळे गावचा पाणी प्रश्न निर्माण झाला त्यावेळेस सर्वप्रथम पाठपन्हाळे ग्रामपंचायत मध्ये यासंदर्भात मीटिंग होऊन कोंडवाडिचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तो कशाप्रकारे सोडवण्यात येईल या संदर्भात चर्चा झाली आणि एप्रिलमध्ये विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू झाले. मला सांगायला आनंद वाटतो की आज कोंडवाडीची हर घर जल योजना ही घोषित झाली आहे. असे सभापती प्रणव पोळेकर यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

पाणी या विषयावरती आपल्याला गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. पाणी वापरताना आपण त्याचं कायम नियोजन केलं पाहिजे भविष्यात पाठपन्हाळे गाव सुद्धा हर घर जल योजनेत लवकर घोषित होईल, असे सभापती प्रणव पोळेकर यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg