दापोली ( प्रतिनिधी ) - कृषी महाविद्यालय, दापोली अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वणौशी तर्फे पंचनदी येथे कार्यरत असलेल्या कृषी स्नेही गटातर्फे देऊळवाडी येथील शेतकरी गोपाळ परांजपे यांच्या शेतात माती नमुना संकलन व मृदापरीक्षण प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे त्याला वणौशी तर्फे पंचनदी येथील शेतकर्यांसह परिसरातील शेतकर्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने कृषी गटाचा प्रयत्न सफल झाला आहे. या आयोजित प्रात्याक्षिकाच्या कार्यक्रमात मृदापरीक्षणामुळे संतुलित खत व्यवस्थापन, उत्पादन खर्चात बचत आणि पीक उत्पादनात वाढ शक्य होते, याबाबत शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रात्यक्षिकामध्ये मातीचा नमुना घेण्याची योग्य वेळ, झिग-झॅग पद्धतीने प्रतिनिधिक नमुना संकलन, नमुना खोली तसेच नमुना घेताना घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देण्यात आली. तसेच मातीचे नमुने एकत्र करून संमिश्र नमुना तयार करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष दाखविण्यात आली. त्याचप्रमाणे नमुना वाळवणे, पिशवीत भरणे व प्रयोगशाळेकडे पाठविण्याची योग्य पद्धत समजावून सांगण्यात आली. उपस्थित शेतकर्यांनी प्रात्यक्षिकास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून घेतले. हे प्रात्यक्षिक सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ अस्लम डोसानी, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.







































































































































.jpg)



























































































































































.jpg)







































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.