loader
Breaking News
Breaking News
Foto

मांगेली रस्ता कडेला उभे केलेले लोखंडी वीज खांब वाकले, ठेकेदाराचा निष्काळजीपणा

दोडामार्ग, (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील अतिदुर्गम ग्रामीण भागात ११ केव्ही वीज वाहिनी वीज खांब हे रस्ता साईडपटट्टी याला लागून घातली आहे. सदर काम करणार्‍या ठेकेदारानेे खांब उभे करण्यासाठी योग्य प्रकारे खोदकाम केले नाही यामुळे अनेक वीज खांब पहिल्या पावसात वाकून खाली झेपावत आहेत. यामुळे मोठा अपघात होऊ शकतो तेव्हा वीज महावितरण अधिकारी यांनी तातडीने पाहणी करून संबंधितांना सूचना करून वीज खांब पडणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खोकरल धार ते मांगेली कुसगेवाडी, देऊळवाडी दरम्यान रस्ता साईडपटट्टीला लागून कोटयावधी रूपये खर्च करून ११ केव्ही वीज वाहीनी लाईन टाकली आहे. काही महिन्यांपूर्वी हे खांब उभे केले. पण ठेका घेतलेल्या ठेकेदाराने योग्य काम केले नाही यामुळे पहिल्या पावसात या कामाचा बोजबारा उडाला आहे. अनेक ठिकाणी लोखंडी वीज खांब वाकून खाली झेपावले आहेत पावसाळ्यात वारा पाऊस मुळे खांब रस्त्यावर किंवा वाहनांवर पडून अपघात होऊ शकतात तेव्हा तातडीने वीज खांब पाहणी करून ते सुरक्षित करावे अशी मागणी मांगेली ग्रामस्थ यांनी केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg