loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्गचे सुपुत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांना सहायक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती

सावंतवाडी; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा ताडदेव पोलीस ठाणे, मुंबई येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सावळाराम पुष्पावती पुरुषोत्तम साळगांवकर यांना सहायक पोलीस आयुक्त (ACP) पदावर पदोन्नती मिळाली असून त्यांची अपर उप आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग (SID), नागपूर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी (साळगावकरवाडी) येथील रहिवासी असलेले सावळाराम साळगांवकर हे गेल्या ३२ वर्षांपासून पोलीस खात्यात उल्लेखनीय सेवा बजावत आहेत. साळगावकर हे रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर कॉलेज रत्नागिरीचे माजी विद्यार्थी असून त्यांनी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्यांनी एन.सी.सी.मध्ये सक्रिय सहभाग घेतला असून सन १९९२ मध्ये प्रजासत्ताक दिन संचलनासाठी नवी दिल्ली येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते. सन १९९४ मध्ये पोलीस सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी मुंबई शहर, विशेष सुरक्षा विभाग (मुंबई), नवी मुंबई, नागपूर आयुक्तालय गुन्हे शाखा तसेच दहशतवाद विरोधी पथक (ATS), मुंबई येथे विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. याशिवाय पुणे शहरातील लोणीकंद, सहकारनगर आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी प्रभावी नेतृत्व केले आहे.

टाईम्स स्पेशल

सध्या ते ताडदेव पोलीस ठाणे, मुंबई येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असून, महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने 23 जून 2026 आदेशान्वे त्यांना सहायक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती प्रदान केली आहे. पदोन्नती बद्दल मा. पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg