loader
Breaking News
Breaking News
Foto

खासगी कंपनीकडून नगरपरिषदेची फसवणूक; राजघराण्यावरील आरोप खपवून घेणार नाही: नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - ‘ग्रो बिग टेक्नॉलॉजी’ ही कोणतीही सामाजिक संस्था नसून ती एक खासगी कंपनी आहे. या कंपनीने नगरपरिषदेकडून केवळ १५ दिवसांसाठी एका रूमची परवानगी घेतली होती. मात्र, प्रत्यक्षात गेल्या दीड महिन्यापासून नियमांचे उल्लंघन करून तीन रूमचा वापर केला जात आहे. नगरपरिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी आम्ही कायदेशीर भाडे आकारणी केली असता, मायकल डिसोजा हे माझ्यावर टीका न करता थेट राजघराण्यावर नाहक आरोप करत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची असून, याप्रकरणी मानहानीचा दावा दाखल करण्याचा आमचा विचार आहे, असा घणाघाती पलटवार सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी केला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या पत्रकार परिषदेला सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, नगरसेविका नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुकन्या टोपले, सुनिता पेडणेकर आदी उपस्थित होते. ​नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले पुढे म्हणाल्या, "माझ्यावर नेहमीच विविध आरोप केले जातात, मात्र आम्ही प्रत्येकवेळी आरोपांना उत्तर न देता कामावर लक्ष केंद्रित करतो. जिमखाना येथील नगरपरिषदेच्या इमारतीत सांस्कृतिक व वस्तू संग्रहालय असल्याने काही चांगल्या गोष्टी करण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. तसेच मुंबई विद्यापीठ व ग्रो बिग टेक्नॉलॉजी यांच्याकडून सुरू असलेले कामकाज पाहणी दरम्यान काही चुकीच्या गोष्टी समोर आल्या. या कंपनीला प्रशासनाकडून १५ दिवसांसाठी ५० हजार रुपये आणि ९ हजार रुपये जीएसटी या दराने जागा देण्यात आली होती. या कराराबाबत कौन्सिलची बैठकही होणार होती."

टाईम्स स्पेशल

​"आज दीड महिना झाला तरी ही कंपनी तिथेच ठाण मांडून आहे. एका रूमची परवानगी घेऊन तीन रूम वापरल्या जात आहेत. याबद्दल विचारणा केली असता प्रशासनाला खोटी माहिती देण्यात आली. तिथे बाथरूम वापरण्याचा कोणताही विषय नसताना, तिसऱ्या रूममध्ये त्यांची मुले जेवत असल्याचे दिसून आले. संबंधित कंपनीने याविषयी प्रशासनाशी बोलणे गरजेचे होते, मात्र त्यांनी तसे केले नाही. नगरपरिषदेच्या इमारतीचा वापर कशासाठी होतो, यावर लक्ष ठेवणे नगराध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत असतानाच ते आमच्या परिवारावर आणि राजघराण्यावर वैयक्तिक टीका करत आहेत. मी राजकारणात सावंतवाडीचा विकास आणि जनतेची कामे करण्यासाठी आले आहे," असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg