सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी शहराच्या अस्मितेचा प्रश्न असणारा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पावर न.प.च्या मासिक सभेत ठराव होऊनही तो पुढे नेण्यासाठी प्रशासनाकडून काहीच पाठपुरावा होत नसल्याने उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी आज झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत प्रशासनाला जाब विचारत खडेबोल सुनावत घरचा अहेर दिला. तर हा प्रकल्प प्रशासनाकडून हलक्यात घेतला जातोय का ? याचे गांभीर्य तुम्हाला नाही का ? असा सवाल केला.
दरम्यान, विषय सुचीवरील ठरावाची प्रत सत्ताधाऱ्यांना वेगळी तर विरोधकांना वेगळी दिल्याने माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आक्रमक होत मुख्याधिकारी यांना जाब विचारला. वादग्रस्त ठरलेल्या ग्रो बीग टेक्नॉलॉजीच्या मुदतवाढीच्या ठरावावेळी हा प्रकार विरोधकांच्या लक्षात आला. तर विषय सुचीत एकुण ९ विषय असताना सत्ताधाऱ्यांकडे १० विषय असल्याचाही प्रकार सभागृहात समोर आला. या दोन्ही प्रकारावरून सभागृहात विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, वादग्रस्त ठरलेला त्या ग्रो बीग कंपनीच्या मुदतवाढीचा ठराव सभागृहात नामंजूर करण्यात आल्याची घोषणा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी केली.
नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक सभागृहात आज न.प.ची सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी विविध विषयांवर सभागृहात चर्चा झाली. यात सुरूवातीलाच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी, नगराध्यक्षा विषयसुचीवर २० सह्या मारतात तर मुख्याधिकारी यांना सह्या मारायला अडचण काय ? असा सवाल करत आक्रमक पवित्रा घेतला. आम्ही लोकांतून निवडून आलेले नगरसेवक आहोत. आम्हाला विषय सुचीची झेरॉक्स कशासाठी देता ? अशी विचारणा केली. यावेळी नगराध्यक्षांनी यापुढे अशी चूक होणार नाही असे स्पष्ट केले.



































































































.jpg)



























































































































































.jpg)




























































































































































































































































































































































































































































































































































































































3.jpg)




















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.