loader
Breaking News
Breaking News
Foto

आरवली माखजन मार्गवर भीषण अपघात, बेदरकार चालकाने पादचाऱ्याला उडवले

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - आरवली ते माखजन मार्गांवर कोडीवरे भुवडवाडी फाटा येथे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी चालवणाऱ्या चालकाने एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून अपघाताची कोणतीही माहिती न देता चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 31 मे रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी पादचारी अमोल बबन मोहिते (वय 31रा कोंडीवरे बौद्धवाडी ता. संगमेश्वर) हे आरवली ते माखजन जाणाऱ्या रस्त्याने पायी चालत जात होते. त्याच वेळी आरवली भुवडवाडी येथील सुभाष रामचंद्र भुवड (वय 53)हा आपली वॅगनार कार (क्रमांक MH/08/AX/2826)घेऊन माखजन बाजूकडून येत होता. कोडीवरे भुवडवाडी फाटा येथील रस्ता चढउताराचा आणि एस आकाराच्या वळणाचा आहे. मात्र चालकाने रस्त्याच्या या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अत्यंत हयगयीने अविचाराने आणि बेदरकारपणे गाडी चालवली भरधाव कारने समोरील पादचारी अमोल मोहिते यांना जोराची धडक दिली. या धडकेत अमोल मोहिते गंभीर जखमी झाले आहेत.

टाईम्स स्पेशल

अपघात घडल्यानंतर संबंधित चालकाने जखमी तातडीने मदत न करता किंवा अपघाताची कोणतीही खबर न देता घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी माखजन पोलीस ठाण्याचे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी चालक सुभाष रामचंद्र भुवड याच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 281,125(अ ), 125(ब ) तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम 184आणि 134 (ब ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा पुढील तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg