loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) खेड शहर महिला अध्यक्ष अश्विनी दरेकर यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश

खेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) खेड शहर महिला अध्यक्ष तथा खेड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढलेल्या सौ. अश्विनी अशोक दरेकर यांनी शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडणगड येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी रामदासभाई कदम यांनी दरेकर यांचे शिवसेनेत स्वागत करत पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी महिलांनी सक्रियपणे पुढे यावे, असे आवाहन केले. दरेकर यांच्या प्रवेशामुळे खेड शहरातील शिवसेना संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याची भावना उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रवेश सोहळ्यावेळी शिवसेना खेड शहर प्रमुख कुंदन सातपुते, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, मानस घोडे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अश्विनी दरेकर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे खेड शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या चर्चांना उधाण आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg