loader
Breaking News
Breaking News
Foto

जावडे शाळा नं1चे मुख्याध्यापक रामचंद्र मापणकर यांचा सेवापुर्ती सोहळा उत्साहात संपन्न

केळंबे-लांजा दी.24जून(सिराज नेवरेकर) ; लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा जावडे न. ०१ चे मुख्याध्यापक रामचंद्र मापणकर यांचा सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला सेवापुर्ती गौरव सन्मान सोहळा सत्कार सभारंभ मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला .कार्यक्रमाला चंद्रकांत गवाणकर , सत्कार मुर्ती रामचंद्र मापणकर व त्यांच्या पत्नी , जावडे गावच्या सरपंच सौ. जान्हवी सोडये, व्यवस्थापक कमिटीच्या अध्यक्ष सौ. अनन्या शिंदे , जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ नामये , तंटामुक्त अध्यक्ष सीताराम नामये, गावप्रमुख सीताराम सोडये , ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गवाणकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकृष्ण शिंदे, मुख्याध्यापक रामदास कदम, कातळवाडी शाळेचे मुख्याध्यापक विजय कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी रामचंद्र मापणकर यांचा शाळा व्यवस्थापन समिती, जावडे ग्रामपंचायत तसेच शाळा व विविध संस्था व व्यक्तींच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सपत्नीक सत्कार करून चांदीची मूर्ती भेट देण्यात आली तसेच गेली १७ वर्षे जावडे प्राथमिक शाळेसाठी तसेच गुणवत्ता वाढीसाठी दिलेल्या योगदानाविषयी अनेकांनी मापणकर यांचे कौतुक केले. तसेच मापणकर गुरुजी यांनी देखील इतक्या वर्षाचा अनुभव तसेच ग्रामस्थांचे सहकार्य याविषयी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षिका प्रिया मांडवकर व द्विविजय पाटील तसेच सर्व पालक व शाळा व्यवस्थापन कमिटीचे सदस्य यांनी विशेष मेहनत घेतली

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg