loader
Breaking News
Breaking News
Foto

राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या१२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

सावंतवाडी (प्रतिनिधी) - तुमची झेप ही चंद्रावर पाऊल ठेवण्यासाठीची हवी. मग, भले चंद्रावर पोहचता आलं नाही तरी तुम्ही एखाद्या ताऱ्यावर निश्चितच पोहचलेले असता, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांनी व्यक्त केले. तर १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसह संस्थेतील प्राध्यापकांचा देखील तेवढाच अभिमान वाटतो असेही उद्घार त्यांनी काढले‌‌. शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभावेळी ते बोलत होते‌.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रारंभी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष कै. विकास सावंत यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे, पत्रकार अभिमन्यू लोंढे, सामाजिक कार्यकर्ते अण्णा सावंत, मुख्याध्यापिका सप्रंवी कशाळकर, प्र. मुख्याध्यापिका डॉ. सुमेधा नाईक धुरी, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत, माजगाव माजी उपसरपंच संजय कानसे, सामाजिक कार्यकर्ते बाबू गवस, माजी मुख्याध्यापक के. टी. परब, माजी पंचायत समिती सदस्य मेघश्याम काजरेकर, शिक्षक नामदेव मुठे, सविता कांबळे, वामन ठाकूर, मिलिंद कासार आदींसह प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

यावेळी आरपीडी हायस्कूलच्या १२ वी परिक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत म्हणाले, बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना आनंद होत आहे. सर्वांनी पुढील शैक्षणिक वाटचालीत यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. या गुणवंत विद्यार्थ्यांकडून सर्व विद्यार्थ्यांनी यशवंत होण्याचा मंत्र घ्यावा. बारावीचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांसोबत संस्था व शिक्षक आहेत. शंभर टक्के यश मिळवून बोर्डात चमका, आपल्या पाठीशी संस्था ठामपणे उभी आहे, असा विश्वास व्यक्त केला. तसेच शिष्यवृत्ती बक्षीसासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांचे त्यांनी कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg