loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली-भेडशी येथे सांज आव उत्साहात साजरा

साटेली-भेडशी प्रतिनिधी, दिनांक 24 जून: गोव्याच्या आणि कोकणच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेला सांज आव सण São João Festival साटेली-भेडशी परिसरात बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. युवकांनी डोक्यावर फुलांचे 'कोपेल' परिधान करून पारंपरिक गीते गात जल्लोष केला. यावेळी अनेकांनी विहिरीत आणि पाणवठ्यांमध्ये उड्या मारून साओ जोआओचा आनंद लुटला. परिसरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात सण साजरा करण्यात आला. महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साओ जाव हा सण संत Saint John the Baptist यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी २४ जून रोजी साजरा केला जातो. पावसाळ्याच्या आगमनाचे स्वागत आणि समाजातील एकोपा जपणारा हा सण गोवा तसेच कोकणातील ख्रिश्चन बांधवांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg