loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनेच्या महिला सेना मालवण तालुका प्रभारी पदी पूनम चव्हाण

मालवण (प्रतिनिधी) - शिवसेनेच्या महिला सेना मालवण तालुका प्रभारीपदी मालवणच्या नगरसेविका व आरोग्य सभापती पूनम नागेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूनम चव्हाण यांची शिवसेना महिला सेना मालवण तालुका प्रभारी पदी निवड करण्यात आली. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच महिला सेनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी पूनम चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेनेच्या महिला सेना जिल्हाप्रमुख सौ.दीपलक्ष्मी पडते यांच्याकडून पूनम चव्हाण यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, नगरसेविका अश्विनी कांदळकर, चित्रा हरमळकर, विद्या फर्नांडिस, प्रभाळे, मधुरा तुळसकर, रश्मी तुळसकर, नंदिनी गडकर, अक्षता गावडे आदी व इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg